Vaishakh Pournima

ll Hari Om ll






श्रद्धावानांनो वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिनी ब्राह्ममुहूर्तावर किंवा त्यानंतरच्या वेळेत उपासना करून सदगुरू कृपेचा लाभ घेवूया !

 वैशाख पौर्णिमा - शनिवार दि . २५ मे २० १ ३.
 वैशाख पौर्णिमेच्या दिवशी  सत्य, प्रेम  आणि आनंद ह्या पवित्र त्रिसुत्रींशी एकरुप झालेले महासिद्धपुरुष विशाल मानवतेच्या द्रूष्टीकोनातून एकत्र येतात व सत्प्रवृतीच्या उत्थापनाची योजना आखतात. अशा ह्या वैशाख पौर्णिमेस तीन महत्वाची प्रमाणे आहे.
१) वैशाख पौर्णिमा ही प्रबौद्ध पौर्णिमा आहे.
२) वैशाख पौर्णिमेचा दिवस पृथ्वीपती विनायकाचा जन्म दिवस मनाला जातो.
३)वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान वेदव्यास सर्व पृथ्वीची एक प्रदक्षिणा चौवीस तासात पूर्ण करतात; असे मानले जाते.
कारण भगवान वेदव्यास त्यादिवशी सुर्याच्याच रथात बसून फिरत असतात. 

वैशाख पौर्णिमेच्या ह्या पवित्रदिनी ब्राह्ममुहूर्तावर किंवा त्यानंतरच्या वेळेत उपासना करणाऱ्या व्यक्तीस सिद्धीभूमित जमणाऱ्या सर्व सिद्धपुरुषांचे आशीर्वाद प्राप्त होतात.
 
अशा  ह्या  वैशाख पौर्णिमेचे महत्व जाणून आपण सहजसिद्ध  श्री. अनिरुद्धांना प्रार्थना करूया,
" हे गुरुराया अनिरुद्धा, तू सामर्थ्याचा,ऐश्वर्यचा,प्रेमाचा,क्षमेचा व शौर्याचा अक्षय साठा  आहेस. तू  अनंत आहेस म्हणून तुच आम्हा सर्वांचा आधार व तारणहारही आहेस. सर्वांचा आधार म्हणून आदिमाता चंडीकेचे आशीर्वाद तुला नित्य प्राप्त आहेच.  म्हणून आम्ही तुझे भक्तप्रिय आदिमाता चंडीकेच्या चरणी  प्रार्थना करतो  की , हे आदिमाते माझ्या सदगुरूंना श्री. अनिरुद्धांना तू सदैव विजयी कर!"
 
" अनिरुद्ध सदा विजयते "
 


वैशाख पौर्णिमा उपासना
.प्रथम एक चौरंग किंवा पाट घेवून त्यावर शाल घालावी नंतर त्यावर आपल्या सद्गुरूंचा हनुमंताचा फोटो ठेवावा.

.श्री सदगुरुंच्या प्रतिमेस सुगंधित किंवा प्राप्त फुलांचा हार घालावा श्री हनुमंताच्या प्रतिमेस रुईच्या पानांचा हार घालावा.

.दीप अगरबत्ती लावून हाथ जोडावे श्री सदगुरूंचे तसेच श्री हनुमंताचे ध्यान करावे.

.त्यानंतर ११ वेळा श्री अनिरुद्ध कवच
 किंवा
...
११ वेळा श्री हनुमान चालीसा
किंवा
११ वेळा हनुमान स्तोत्र
किंवा
११ वेळा श्री साईबाबांची ११ वचने
किंवा
११ वेळा श्री अनिरुद्धांची वचने
किंवा
११ वेळा आदिमाता शुभनकरा स्तवन ११ वेळा अशुभनाशिनी स्तोत्र म्हणावे.

.त्यानंतर-
) आंब्याच पन्ह
) कच्च्या आंबा भिजलेली चण्याची डाळ वाटून त्याचा प्रसाद अर्पण करावा त्यानंतर लोटांगण घालावे.
ब्रम्हमुहूर्तावर उपासना करणे शक्य झाल्यास दिवसभरात कधीही करणे.
जो कोणी प्रेमाने वैशाख पौर्णिमेला हि उपासना करेल त्याच्या घरी ह्या दिवशी सद्गुरू हनुमंताबरोबर येवून जातोच. अशी ग्वाही सदगुरू श्री आनिरुद्धानी दिली आहे.




Vaishakh Pournima Upasana (Saturday 25.05.2013)

1) First on a Chaurang or paat place a clean cloth/shawl. After that place our Sadguru's and Hanumanta's Photo on it.

2) To Sadguru's photo offer a garland of flowers and to Hanumanta's photo offer a garland of Rui leaves. 


3) Light Diya and Agarbathi and while doing dhyan of Sadguru and Hanumant join your hands in prayer.
4) After that chant 

11 times Shri Aniruddha Kavach
 or 11times Shri Hanuman Chalisa 
or 11 times Hanuman Strotra 
or 11 times Shri Saibaba's 11 Vachna 
or 11 times Shri Aniruddhachi 9 Vachna 
or 11 times Shubhankara Stavnam 
or 11 times Ashubhnashini Stavnam.
 

5) After that 1) Ambyacha Pana 2) Kachcha Amba and Soaked Chana Dal grinded together.Offer this as prasad followed by Lotangan.

[If one is unable to perform this upasana on brahma Mhurta, then they can perform it at any time of the day.]

Whoever performs this upasana above given upasana on the day of Vaishak Pournima our Dear Sadguru Shri Aniruddha Bapu, alongwith Lord Hanumant definitely visits them on this day. This is a promise given by Sadguru Shree Aniruddha Bapu.




ll Hari Om ll



ll I am Ambadnya ll

Comments

Popular posts from this blog

Shri Govidyapeetham

Trivikram

Ghorkashtodharan Stotra Pathan in Shravan month starts from 27th July 2014