Shri Gurucharan Maas - Shri Hanuman Chalisa pathan from vatpournima (12.06.2014) to Gurupournima (12.07.2014)



ll Hari Om ll



In the month of "Guru Charan" that is from vatpournima (12.06.2014) to Gurupournima (12.07.2014), we can get Sadgurukrupa by doing pathan of Hanuman Chalisa, any one day, for 108 times.

श्रद्धावानांनो 'श्री गुरूचरण'महिन्यात  अर्थात वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा ह्या कालावधीत कोणत्याही एका दिवशी   वेळा 'हनुमानचलिसाचे' पठण करून सदगुरूकृपा  प्राप्त करून घ्यावी.
Saint Tulsidasji first prays at feet of Sadguru before doing gunsankirtan of Shri Hanumanji.
संत  तुलसीदासजी श्री हनुमंताचे गुणसंकीर्तन करण्यापूर्वी प्रथम सदगुरुच्या चरणाचे स्मरण करतात त्यानंतर हनुमंताना प्रार्थना करतात  की,

                                                                  Courtesy Pratyakasha

  
सदगुरू हा सातत्याने मार्गदर्शन करतच असतो त्यांचा शब्द हृदयात घट्ट पकडून ठेवला कि त्याच्या चरणाचे कधीच विस्मरण होत नाही. आपण सदगुरू अनिरुद्धांच्या चरणांचे ध्यान करून सदगुरू अनिरुद्ध ध्वनीचा स्विकार करूया. 'श्री हनुमानचलिसा हृदयात उतरवूया कारण महाबली, महापराक्रमी हनुमंत म्हणजे साक्षात सेवा, भक्ती, त्याग, पावित्र्य सत्य अशा अनंत गुणांची जीवंतमुर्ती अर्थात महाप्राण म्हणून 'हनुमानचलिसाचे' पठण म्हणजे श्रद्धावानांसाठी साक्षात सदगुरू कृपेचे कवच. ते कवच माझा जन्मोजन्मी उद्धार करते.
  



श्री गुरुचरण महिन्यात   वेळा हनुमानचलिसा का पठाण करावे ह्याचे महात्म्य सांगणारी कथा आधी बघुया

  
संत तुलसीदासांच्या काळात काऴया कुविधेच्या उपासकांनी गंगातीरावर एक मंदिर बांधले होते त्या मंदिराचा विध्वंस करण्याचे सामर्थ्य केवळ हनुमंतामध्ये आहे हे जाणून तुलसीदासांनी श्री हनुमंताना प्रसन्न करण्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाखाली बसून रोज तीन वेळा हनुमानचलिसा पठणास बसले . रोज तीन वेळा  म्हणजे सकाळी वेळा, दुपारी वेळा संध्याकाळी  वेळा आणि तेही तीस दिवस


तीस दिवसांनी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी हनुमंत प्रकट झाले त्यांनी ती अपवित्र वाईट वस्तु नष्ट केली. त्यामुळे तुलसीदासांना अत्यंत आनंद झाला. त्यांना आनंदात बघून हनुमानजी  तुलसीदासांना प्रश्न करतात की, "तु  एवढा आनंदित का? तुझे संरक्षण पहिल्यापासूनच होते". त्यावर तुलसीदासजी  म्हणतात की "हनुमानजी  मी आता सर्वांना सांगू शकतो की, आपल्या कडे भक्तीचा लवलेश ही नसताना दयाळु हनुमंतानी आपल्याला त्रास होऊ नये म्हणून ह्या अपवित्र वस्तुचा नाश केला आहे आपले सर्वांचे रक्षण केले आहे. म्हणून आपण सर्वजण हनुमंताचे स्मरण करूया. केवळ ह्या निमिताने तरी ते आपले (हनुमंताचे) नामस्मरण करतील."

त्यावर तुलसीदासांची  निष्ठा तपासण्यासाठी हनुमंतजी त्यांना उलट प्रश्न करतात "तुझ्यावर विश्वास कोण ठेवील?". त्यावर तुलसीदासजी वादावादी करता हनुमानजींना सांगतात "देवा तु म्हणतोस ते बरोबर", येवढे बोलून पुन्हा पठण करण्यास बसतात

त्यानंतर हनुमानजी मानवी रुपात गावात जाऊन - जणांना सांगतात की, त्या वटवृक्षाखाली बसलेला म्हातारा पाखंडी आहे. तुम्ही जाऊन त्याला मारा

हनुमंताच्या मुखातील हे शब्द ऐकताच ते सर्वजण काठयांनी तुलसीदासजी वर वार करतात त्यांना दगडानी मारतात परंतु त्यांना काहीचं होत नाही उलट दगड मारण्यारयाच्या उलटे येतात, ते सर्वजण घाबरतात भीतीपोटी (प्रेमाने नाही) तुलसीदासांना शरण जातातत्याचवेळी तुलसीदासजी त्यांना सांगतात "माझ्याकडे काही जादू नाही, हे सामर्थ आहे त्या हनुमंतांचे, त्याच्या हनुमान चालीसा पठणाचे, तुम्ही मारलेल्या  दगडांची काठयांची फुले होतील हनुमंताच्या चरणाशी पडतील, आणि तसेच होते. ते सर्वजण तुलसीदासजीकडे हनुमान चालिसा शिकू लागतात

त्या रात्री पुन्हां हनुमानजी तुलसीदास बरोबर समोर प्रकट होऊन त्यांना विचारतात "तु एवढा खुष का? तुला काय मिळाले?", तुलसीदासजी उतरतात "तुझ्या नामाची गोडी सामान्य जनांना लागली, मला पाहिजे ते मिळालं", त्याला हनुमानजी तुलसीदासांना विचारतात "मग त्याने क्या झाले?", त्यावर तुलसीदासानी दिलेले उत्तर त्यांच्या भक्तीची परमोच्च स्तिथी दर्शविते, तुलसीदासजी म्हणतात "हे मी जाणत नाही, ते तू आणि लोक जाणो. मी एवढेच जाणतो की, तू तुझे नाम अतिशय सुंदर आहे, पवित्र आहे, तू काय करू शकतोस हे जाणून घेण्याची मला आवश्यकता नाही". कृपाळू हनुमंत प्रसन्न होतात तुलसीदासांना सांगतात, "तू जे काही मागायचं ते माग". 

तुलसीदासजी अत्यंत विनम्रपणे हनुमंताना प्रार्थना करतात "हे दयाळू हनुमान जो कोणी ह्या तीस दिवसात म्हणजे वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा ह्या कालावधीत, घरात, मंदिरात, जंगलात, किंवा शक्य असेल तेथे कुठेही बसून दिवसातून दिवस केवळ एकदाच वेळा हनुमान चालिसाचे पठण करील त्याचे तू रक्षण कर, मात्र तू माझी परीक्षा घेतली तशी त्याची परीक्षा तू घेऊ नकोस ". 

तुलसीदासांच्या मुखातील हे शब्द ऎकून हनुमानजी प्रसन्न होतात "तस्थास्तु" म्हणून निघून जातात. तेव्हांपासून एका दिवसात वेळा हनुमान चालिसा म्हणण्याची प्रथा सुरु झाली.
 


Let us pray at feet of our Dear Sadguru Shri Aniruddha Bapu, "Hey Sadgururaya Aniruddha you only get Hanuman Chalisa pathan done from us, Hey Sadgururaya Aniruddha you be our guide and show us path towards you, Hey Sadgururaya Aniruddha make us your das forever".




ll Hari Om ll

ll Shree Ram ll

ll I am Ambadnya ll

ll I Love you my Dad ll



 



 

Comments

Popular posts from this blog

Shri Govidyapeetham

Trivikram

Ghorkashtodharan Stotra Pathan in Shravan month starts from 27th July 2014