Shri Vaibhavlakshami Poojavrata - Shri Gurukul



ll Hari Om ll



नंदामाई म्हणा, नंदामाई म्हणा l
हीच विश्वमाता चिदानंदा ll  
श्रीविश्वलोचन चक्रराज सांगे l
आईचिया मार्गे पावे भक्ती ll
महाप्राणज्योत प्रकाशी हे सत्य l
श्रीमाता ही नित्य महाशक्ती ll
पूर्णा आल्हादिनी अनिरुद्धरमणी l
ललिता संधिनी नंदामाई ll

                                       ............... श्रीनंदामाई  पाठ
                                   Dr. Yogendrasinh Joshi

मार्गशीर्ष महिन्यात श्रद्धावान पुरुष स्त्रिया वैभवलक्ष्मी पूजाव्रत करतात कारण:
. ही वैभवलक्ष्मी विश्वमाता आपल्या श्रद्धावान बाळांना सुख, आनंद, विजय   सुयश देण्यासाठी नित्य तत्पर असते .
. ही लक्ष्मीमाता आपल्या बाळांच्या व्याधींचा नाश करून त्यांचा दुष्प्रारब्धापासून बचाव  करते. त्याच्यावर आलेल्या संकटापासून रक्षण करते.
. हीच भगवान महाविष्णूची आदिशक्ती आपल्या बाळांसाठी सौभाग्य आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून नित्यात्वाने कार्यरत राहाते अविरत परिश्रम करते.
. हीच महनमंगल माता आपल्या बाळाचं नित्य मंगल व्हावं, कल्याण व्हावं म्हणून भगवान महाविष्णूच्या चरणी नित्य प्रार्थना करते.

. हीच विश्वमाता भगवान महाविष्णूची अभिन्न चेतना शक्ती आहे. चिन्मय पराशक्ती आहे, श्री विद्या आहे. परमात्म्याची आदिशक्ती आहे आपल्या बाळासाठी अभ्युदय, वैभव, कृपा, सुख षोडसऐश्वर्य देणारी महाविष्णूच्या अधिष्ठात्री देवता आहे.

हया संपूर्ण  विश्वाची प्रत्येक क्रिया श्री विधेच्या नियमानुसारचं होते. संपूर्ण विश्वाची शक्ती, सामर्थ्य तसेच ऐश्वर्य हया 'श्री' च्या आधीन असते ती आधीशक्ती माता म्हणजेच लक्ष्मीमाता, तिच्या कृपेमुळेच श्रद्धावानांना लक्ष्मीची कृपा सहज प्राप्त होते.

जिथे परमात्म्याचे चरण आहेत, जिथे परमात्म्याच्या चरणांचे पूजन केले जाते, जिथे परमात्म्याने दिग्दर्शित केलेली श्रद्धायुक्त निष्काम भक्ती निष्काम सेवाभक्ती  आहे तिथे ही लक्ष्मीमाता नित्य वास्तव्य   करून असते.

लक्ष्मीमातेला कोणतीही पांच प्रकारची पक्वान नैवेध् म्हणून अर्पण केले जातात. मात्र प्रेमाने अर्पण केलेला डाळ, भात, भाजी, पोळी, तुपसाखर किंवा पाण्याच्या  नैवेध्याने किंवा त्यातील कोणत्याही एका पदार्थाने देखील देवी संतुष्ट होते मात्र देवीला प्रिय असलेली

पांच पक्वान म्हणजे ...
. स्वच्छता
. परिश्रम (अर्थात पावित्र्य हेच प्रमाण)
. श्रद्धा
. सबुरी
. उचित ठिकाणी केलेले सत्पात्री दान.
जे श्रद्धावान  हया पांच गुणाचा स्विकार करतात त्या श्रद्धावानांना लक्ष्मीमातेचा नित्य प्रतिसाद मिळतो   त्यातूनच प्रत्येक श्रद्धावानांचा अभ्युदय घडून येतो.


आपल्या हया विश्वमातेचे नित्य स्मरण हाच मानवाच्या कल्याणाचा द्रुक्ष्प्रारब्ध नाशाचा सोपा मार्ग मात्र उत्सवाच्या वेळी पूजन केल्याने धनदौलतीच्या बरोबरच अत्यंत आवश्यक. अशा शांती, तृप्ती, भक्ती  समाधान ह्याचे दान मातेकडून सहज प्राप्त होते

                                                      .......... Shri Aniruddha Gurushetram Patrika no. 22

Shri Vaibhav Laxmi Utsav will be celebrated in the holy month of Margshirsh on 06.12.2013, 13.12.2013, 20.12.2013 and 27.12.2013, at the Shri Shetra Gurukul, Juhinagar, Navi Mumbai.


असा ह्या गुरुकुलाच्या आध्यापिपा कक्षेमध्ये वैभवलक्ष्मी मूर्तीची स्थापना केली जाते सेवेकरी माते समोर होम करतात हया होमाची आवर्तने सकाळी .३० वां सुरु होतात रात्रौ .०० वाजतां होमाची संपन्नता होते

  श्रद्धावानांना होमच्या वेळी केलेल्या आवर्तनात सहभागी होता येते. त्यानंतर श्रद्धावान पुरुष  स्त्रियांना आपल्या इच्छेनुसार देवीला चुनरी किंवा ओठी अर्पण करतां येते.

 श्रीक्षेत्र गुरुकुल, जुईनगर, येथील हा वैभव लक्ष्मी उत्सव म्हणजे ...........
श्रधावानांसाठी पर्वणीच आहे.

ll Hari Om ll
ll Shri Ram ll
ll I am Ambadnya ll

 

Comments

Popular posts from this blog

Shri Govidyapeetham

Trivikram

Ghorkashtodharan Stotra Pathan in Shravan month starts from 27th July 2014